६० वर्षांनंतर नाणोस येथील श्री वेतोबा विविध कार्यकारी सेवा सोसायटीची निवडणूक बिनविरोध

12

 

सावंतवाडी (प्रतिनिधी)

६० वर्षांनंतर नाणोस येथील श्री वेतोबा विविध कार्यकारी सेवा सोसायटीची निवडणूक बिनविरोध

 

चेअरमनपदी तातो शेट्ये, तर व्हाईस चेअरमनपदी सखाराम जोशी यांची निवड

नाणोस येथे ६० वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर प्रथमच श्री वेतोबा विविध कार्यकारी सेवा सोसायटी लि., नाणोस या संस्थेची निवडणूक ‘नाणोस गाव परिवर्तन पॅनल’च्या माध्यमातून बिनविरोध पार पडली. या ऐतिहासिक घटनेनंतर आज (मंगळवार) चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवडही बिनविरोध झाली. सहाय्यक निबंधक अधिकारी तथा सोसायटी सेक्रेटरी श्री. राजाध्यक्ष यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली. यावेळी चेअरमनपदासाठी श्री. तातो गंगाराम शेट्ये यांची, तर व्हाईस चेअरमनपदासाठी श्री. सखाराम भगवान जोशी यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. या निवडीमुळे नाणोस गावामध्ये एक नवीन अध्याय सुरू झाला आहे. याप्रसंगी सोसायटीचे सदस्य श्री. मदन नाणोसकर, श्री. राजाराम नाणोसकर, श्री. राजन नाणोसकर, श्री. भालचंद्र नाणोसकर, श्री. गंगाराम जोशी, श्री. रघुनाथ जोशी, सौ. कांचन नाणोसकर, सौ. सिताबाई गोडकर, श्री. सद्गुरु शेट्ये यांच्यासह श्री. शंकर शेट्ये, श्री. सागर नाणोसकर, श्री. विनायक शेट्ये, श्री. अंकुश शेट्ये आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बिनविरोध निवडीमुळे संस्थेच्या पुढील वाटचालीस गती मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.