कळसुली येथील वासुदेव दळवी यांचे निधन

18

 

कणकवली (प्रतिनिधी)

कळसुली येथील वासुदेव दळवी यांचे निधन

कळसुली येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वासुदेव उर्फ आबा दळवी (वय १०१) यांचे वृद्धापकाळाने कळसुली येथील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. वासुदेव दळवी हे सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय होते. कळसुली विविध कार्यकारी सोसायटी, कळसुली प्राथमिक शाळा, कळसुली हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज यांसारख्या संस्थांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्यातील परोपकारी स्वभावामुळे त्यांनी समाजाच्या विविध स्तरांतील लोकांना आपल्याशी जोडून ठेवले होते.

 

वासुदेव दळवी हे ओसरगाव सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे कर्मचारी श्रीकृष्ण दळवी यांचे वडील तर प्रसिद्ध कवी तथा ज्येष्ठ पत्रकार अजय कांडर यांचे सासरे होत. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, मुली, जावई, नातवंडे आणि पतवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर कळसुली स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.