देवगड (प्रतिनिधी)
श्री देव रामेश्वर मंदिराचा १० वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा होणार
मिठबाव ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिराचा १० वा वर्धापन दिन सोहळा रविवार, दिनांक ११ मे २०२५ रोजी उत्साहात साजरा होणार आहे. हा सोहळा ग्रामदेवालये जीर्णोद्धार समिती व श्री देव रामेश्वर देवस्थान समिती यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न होणार आहे.
या निमित्ताने मिठबाव, कातवण व तांबळडेग येथील ग्रामस्थ बांधव-भगिनींसह सर्व भक्तगणांनी व गाव रयतेने कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे
सकाळी ८ ते १२: धार्मिक विधी, रुद्राभिषेक, आरती व मंत्रपुष्प
दुपारी १ ते ३: महाप्रसाद
सायं. ४ ते ६: सामुदायिक हरिपाठ
सायं. ६ ते ७.३०: स्थानिक गायकांचे सुश्राव्य गायन
सायं. ७.३० नंतर: स्थानिक भजने
रात्रौ ९ वा.: श्री गजानन प्रासादिक भजन मंडळ, बांदिवडे यांचे सुश्राव्य भजन (बुवा: सन्मा. रुपेश मेस्त्री)
या भजन सोहळ्याचा सर्व भजनप्रेमी व रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.







