कणकवली (प्रतिनिधी)
करंजे गोवर्धन गोशाळेचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ११ मे रोजी उद्घाटन – खा.नारायण राणे
करंजे गोवर्धन गोशाळेला भेट देऊन जिल्ह्यातील तरुण शेतकरी यांनी प्रेरणा घ्यावी

गोपालन , पशुपालन वाढीस लागावे, उद्योजकता वाढीस लागावी हा उदात्त हेतु
आपले दोन्ही नातु अभिराज आणि निमिष यांना गाईबद्दल प्रेम आहे.ते गाईना चारा घातल्याशिवाय शाळेत जायला बघत नसत.त्यातुनच गोशाळा उभारण्याची संकल्पना आपल्याला सुचली.अशी माहिती खासदार नारायण राणे यांनी करंजे येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.आपल्या भारतीय संस्कृतीत गोमातेचे, गोसेवेचे महत्व अधोरेखित आहे .म्हणूनच आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली तालुक्यात करंजे येथे आदर्श आणि परिपूर्ण अशी गोवर्धन गोशाळा आपण उभारली आहे. असे त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ.मिलिंद कुलकर्णी, संदीप कुडतरकर, माजी सभापती सुरेश सावंत उपस्थित होते.यावेळी पुढे बोलताना खा.राणे म्हणाले की,भारतातील विविध जातींच्या गीर, साहीवाल, देवली, पुंगनूर तसेच स्थानिक कोकण कपिला, खिल्लार अशा शेकडो गाई या गोशाळेत दाखल झाल्या आहेत. गोवर्धन गोशाळेचे उद्घाटन राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दिनांक ११ में रोजी, दुपारी १ वाजता होणार आहे असे खासदार राणे यांनी सांगितले.
खासदार.राणे पुढे म्हणाले की,गोमातेची सेवा, गोपालन यांची मोठी महती आपल्या भारतीय संस्कृतीने वर्णिली आहे.गाय म्हणजे समृद्धी। गाय म्हणजे सम्पन्नता। गाय म्हणजे पावित्र! ही आपल्या संस्कृतीची शिकवण आहे. हे ध्यानात घेऊन आपल्या जिल्ह्यात कणकवली तालुक्यातील करंजे या गावी गोवर्धन गोशाळेची उभारणी पूर्ण झाली आहे.देशभरातील गीर, देवली, साहीवाल, पुंगनूर, कोकण कपिला अशा विविध जातींच्या शेकडो गाई या गोशाळेत आहेत. जिल्ह्यातील भाकड गाई ,वृद्ध जनावरे, बैल यांचाही सांभाळ या गोशाळेत होणार आहे. तसेच गोदुधापासुन जसे की तूप, लस्सी, ताक, बासुंदी, पनीर अशी विविध उत्पादने घेतली जाणार असून त्याचे प्रशिक्षण मार्गदर्शन सुद्धा या गोशाळेत होणार आहे. त्याशिवाय गोमुत्रापासून औषधे निर्माण करणे, गोमयापासून खत, गोबर गॅस ,रंग निर्मिति करणे हेही उपक्रम होणार आहेत.
जिल्ह्यातील तरुण, स्थानिक तरुण,शेतकरी यानी ही गोशाळा पाहुन यातून प्रेरणा घ्यावी. आणि गोपालन, पशुपालन वाढीस लागावे, “घरोघरी गाय.. घरोघरी समृद्धी “याचा सर्वाना प्रत्यय यावा हाच यामागचा स्तुत्य हेतु आहे.उद्योजकता वाढीस लागावी हाच उदात्त हेतु यामागे आहे.असेही खासदार राणे यांनी सांगितले.सर्व जिल्हावासीय, तरुण शेतकरी यानी या गोशाळेस भेट द्यावी आणि प्रेरणा घ्यावी.असे आवाहन खा.राणे यांनी केले.यावेळी पत्रकारांसोबत गोशाळेला भेट देत विविध माहिती दिली.





