अखेर देवगड शहरातील मांजरेकर नाका येथील वाहतुकीस अडथळा ठरत असलेले ते दगडी कंपाउंड हटविले

60
oplus_0

 

देवगड (प्रतिनिधी)

अखेर देवगड शहरातील मांजरेकर नाका येथील वाहतुकीस अडथळा ठरत असलेले ते दगडी कंपाउंड हटविले

एसटी विभागाकडून दिलेल्या पत्राची दखल घेत देवगड-जामसंडे नगरपंचायतीने गुरुवारी हटविले ते बांधकाम
        देवगड कुणकेश्वर सागरी मार्गावर प्रवास करताना देवगड शहरात वाहतुकीला अडथळा ठरत असलेल्या मांजरेकर नाका येथील दगडी कंपाऊंडची भिंत नगरपंचायतीने जेसीबीच्या सहाय्याने गुरुवारी दुपारी हटविली.त्यामुळे वाहन चालकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
देवगड कुणकेश्वर सागरी मार्गावर एसटी प्रवासी फेरी मागील एकमहीन्या पूर्वी सुरू झाली. मात्र हे कंपाउंड वॉल एसटी वाहतुकीस प्रमुख अडथळा ठरत होते. देवगड मांजरेकर नाका येथील दगडी कंपाउंडवॉल कुणकेश्वर येथे एसटी जाताना वळण घेतेवेळी अडथळा निर्माण होत असल्याने चालकाला करत करावी लागत होती शिवाय हे कंपाउंड वॉल अपघातात कारणीभूत ठरत होते.हा कंपाउंड वॉल वाहतुकीला त्रासदायक ठरत ते बांधकाम हटविण्यात यावे अशी वाहन चालकांची नागरिकांची मागणी होती.
मांजरेकर नाका येथील ही कंपाऊंड वॉल हटवावे यासाठी देवगड एसटी विभागाने देवगड जामसंडे नगरपंचायतीला यासंदर्भात पत्र दिले .व त्यानंतर देवगड जामसंडे नगरपंचायतीने जेसीबीच्या साहाय्याने गुरुवारी कंपाऊंड हटविण्यात आले.ही कंपाउंड वॉलची भिंत हटविली .यामुळे वाहन चालकांची होणारी गैरसोय दूर झाल्याने वाहन चालकांमधून समाधान व्यक्त होताना दिसत आहे.