चौंडेश्वरी मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त उद्यापासून कार्यक्रम
कणकवली शहरातील गणपती साना येथील श्री चौंडेश्वरी मंदिराचा २२ वा वर्धापन दिनानिमित्त ७ ते ८ मे रोजी या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्हा कोष्टी समाज सेवा संघ यांच्यावतीने मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. बुधवार ७ मे रोजी सकाळी ८ वा. महिलांची कलशदिंडी, ९ वा. श्री नवचंडी होमहवन पुजाविधी, रात्री ८.३० वा. शैक्षणिक बक्षीस वितरण सोहळा, ९.३० वा. सुहास वरुणकर आणि रवी कुडाळकर निर्मित रंगभूमी कणकवली आणि चिमणी पारखे प्रस्तुत व्हरायटी शो सादर होणार आहे. गुरुवा ८ मे रोजी सकाळी ९ वा. श्री सत्यनारायणाची महापुजा, ११ वा. आरती व तीर्थप्रसाद, दुपारी १ वा. महाप्रसाद. तरी या कार्यक्रमांच सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कोष्टी समाज सेवा संघाने केले आहे.