देवगड (प्रतिनिधी)
कोकण आधार प्रतिष्ठानने जोपासली शैक्षणिक बांधिलकी
जि प प्राथमिक शाळा किंजवडे ठाकूरवाडीतील ग्रामीण भागातील गोरगरीब,होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
सामाजिक कामकाजांबरोबरच शैक्षणिक कार्यातही अग्रेसर राहणारे ‘कोकण आधार प्रतिष्ठान’ नेहमीच सामाजिक बांधिलकी बरोबरच शैक्षणिक बांधिलकी जोपासण्याचे मोलाचे कार्य करत असल्याचे निदर्शनास येते. शुक्रवारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किंजवडे ठाकूरवाडीतील ग्रामीण भागातील गोरगरीब,होतकरू विद्यार्थ्यांना साहित्य वितरण करण्यात आले. शैक्षणिक,सामाजिक जाणीव जागृतीचा संदेश देत सामाजिक उपक्रमाबरोबरच शैक्षणिक उपक्रम हाती घेतलेले आहे. कोकणातील पाचही जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी प्रत्येक शाळेमध्ये स्कूल बॅग,पेना,लेखन साहित्य, वहया वितरित करण्यात आले.सर्व विद्यार्थ्यांना गोड खाऊ वाटप केले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किंजवडे ठाकूरवाडी शाळेतील वीस विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वितरणाचा उपक्रम घेण्यात आला.
विद्यार्थ्यांनी शिकून खूप मोठे व्हा. आकाशाला गवसणी घाला. आई-वडिलांना कधीच विसरू नका. तसेच शाळेला व शाळेतील गुरुजींना विसरू नका.असा सल्ला दिला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वप्निल मेस्ञी यांनी दिला.





