देवगड तालुक्यातील पडवणे गावात बीएसएनएल टॉवरचा शुभारंभ ;  नामदार नितेश राणे यांनी केले आश्वासन पूर्ण

27

 

देवगड (प्रतिनिधी)

देवगड तालुक्यातील पडवणे गावात बीएसएनएल टॉवरचा शुभारंभ ;  नामदार नितेश राणे यांनी केले आश्वासन पूर्ण

देऊ तो शब्द पुरा करू यानुसार आपण पडवणे गावामध्ये बीएसएनएलचा टॉवर सुरू करू असे आश्वासन दिले होते. ते मी पूर्ण केले आहे. माजी खासदार अनेक आश्वासने देत होते, मात्र त्यांच्या टॉवरला कधीच रेंज नसायची. मात्र, नारायण राणे यांनी खासदार झाल्यावर अनेक आश्वासने पूर्ण केली आहेत.
पडवणे ग्रामस्थांच्या वतीने आपण राणेसाहेबांना विनंती केली होती. या विनंतीनुसार त्यांनी हा टॉवर दिला आहे. यामुळे त्यांचेही आभार मानणे गरजेचे आहे. मतदारसंघातील कामाला न्याय देण्याची कायमच भूमिका आहे. यामुळे या गावातील रस्त्याची मागणी आपण पुढील जिल्हा नियोजनच्या निधीमधून पूर्ण करू, असे मत बंदर व मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केले.
विधानसभा निवडणुकीपूर्वी पडवणे गावातील टॉवरचे भूमिपूजन नितेश राणे यांनी पार पाडले होते. हा टॉवर सुरू होऊन त्याचा शुभारंभ नामदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी त्यांच्यासमवेत भाजप नेते बाळ खडपे, संजय बोंबडी, पडवणे गावचे सरपंच भूषण पोकळे, तालुकाध्यक्ष बंड्या नारकर यांच्यासह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते.