पशुधन हीच शेतकऱ्याची खरी संपत्ती | सतीश सावंत यांचे प्रतिपादन

विश्वकर्मा मित्र मंडळ आयोजित बैलगाडा स्पर्धेचे उद्धाटन | निम्मेवाडीत उडाला बैलगाडी स्पर्धेचा धुरळा

कणकवली : विश्वकर्मा मित्र मंडळ आयोजित बैलगाडा स्पर्धेचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले. स्पर्धेच्या माध्यमातून मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला दिसत आहे. कणकवली शहराचा जवळजवळ काँक्रिटीकरण होत असून शहरी भाग बनत चाललेला आहे. शहरातील थोडासा भाग हा ग्रामीण शेतीचा भाग राहिलेला आहे. या ठिकाणी इथले शेतकरी शेती करत असतात त्याचबरोबर शेतकऱ्याचं जे पशुधन आहे. तीच शेतकऱ्याची संपत्ती आहे आणि त्याला जिवापाड त्याच्यावर प्रेम करणार आहे सर्व शेतकरी मंडळी आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून शेतकऱ्याला वेगळा आनंद होईल. या स्पर्धेमध्ये जवळपास ३५ ते ३८ बैलगाडा स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आहे

जर एखाद्या राज्यकर्त्याला सभा घ्यायच्या असेल तर गावागावातून गाड्या आणाव्या लागतात. मग ती सभा यशस्वी होते. आज या स्पर्धेच्या ठिकाणी कोणत्याही गावातून गाडी आणण्याचा प्रयत्न केला नाही. फक्त प्रत्येकाच्या कानावर गेल्यानंतर उत्स्फूर्त असे सर्वजण या स्पर्धेकडे आलेले आहेत. जवळपास या स्पर्धेसाठी हजारो संख्येने लोक याठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये बैलगाडा शर्यतीमध्ये किती जिव्हाळा आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून दिसून येत आहे. हा बैलगाडा थरार अनुभवत असताना त्याचा आनंद या शेतकऱ्याला मिळणार आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यामागे कणकवली नगरसेवक सुशांत नाईक आणि विश्वकर्मा मित्रमंडळाचे पदाधिकारी यांनी फार मोठी मेहनत घेतली आहे. वेगवेगळ्या प्रशासकीय मान्यता देखील त्यांनी घेतले आहेत. तसेच मानाच्या बैलगाडीतून ४०० मीटर फेरफटका मारून उद्घाटन केले त्यानंतर खऱ्या अर्थाने स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. यावेळी मालवणचे आमदार वैभव नाईक, सतीश सावंत, सुशांत नाईक, कन्हैया पारकर, उपस्थित होते