सिंधुदुर्ग (प्रतिनिधी)
पालकमंत्री नितेश राणे २७ मार्च रोजी ओरोस येथे घेणार जनतेच्या गाठीभेटी
येथील पालकमंत्री संपर्क कार्यालयात स्वीकारणार जनतेची निवेदने
मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे हे गुरुवार २७ मार्च रोजी ओरोस सिंधुदुर्ग नगरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारती मधील पालकमंत्री संपर्क कार्यालयात जनतेच्या गाठीभेटी घेणार आहेत. दुपारी ३ ते सायंकाळी ७ या वेळेत ते जनतेसाठी उपस्थित राहणार आहेत. यावेळी जनतेची गाऱ्हाणी ऐकून घेणार आहेत.





