देवगड : (प्रतिनिधी)
बँक ऑफ इंडिया मिठबांव शाखेत २ लाखाचा अपहार : २०२३ मधील घटना , तत्कालीन बँक व्यवस्थापकाविरूध्द गुन्हा दाखल
बँकेच्या एफडी खातेधारकांच्या खात्यात असलेल्या २ लाख १५ हजार ६९२ रूपये रकमेचा अपहार केल्याप्रकरणी बँक ऑफ इंडिया मिठबांव शाखेचे तत्कालीन व्यवस्थापक योगेश प्रकाश भिलाणे(३४) रा. निमखेडी रोड, देवरामनगर जळगाव यांच्याविरूध्द देवगड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना १२ जानेवारी २०२३ ते १९ जानेवारी २०२३ या कालावधीत घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, दि.१२ जानेवारी २०२३ ते १९ जानेवारी २०२३ या कालावधीत बँक ऑफ इंडिया मिठबांव शाखेचे तत्कालीन शाखा व्यवस्थापक योगेश प्रकाश भिलाणे यांनी
बँकेकडून देण्यात आलेल्या अॅक्सेसचा वापर करून बँक ऑफ इंडिया या बँकेच्या एफ्डी खातेधारकांच्या खात्यात असलेल्या एकूण २ लाख १५ हजार ६९२ रूपये रकमेचा अपहार केला अशी तक्रार बँकेचे मिठबांव शाखेचे शाखाव्यवस्थापक सुरज संतोष पोराटे यांनी देवगड पोलिस स्थानकात दिली.
या तक्रारीवरून पोलिसांनी योगेश भिलाणे यांच्याविरूध्द भादवि कलम ४२०, ४०६, ४०९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.तपास पोलिस उपनिरिक्षक संतोष भालेराव करीत आहेत.





