ध्वनी प्रदूषणामुळे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ या दोघांवर परिणाम – सुनील जाधव
ध्वनी प्रदूषणामुळे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ या दोघांवर परिणाम होतो असे प्रतिपादन जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.सुनील जाधव यांनी केले.
“ ध्वनी प्रदूषण “ या विषयावर बोलताना श्री.सुनील जाधव पुढे म्हणाले की,ध्वनी प्रदूषणामुळे शारीरिक व मानसिक ताण वाढतो.मनुष्य चिडचिडा आणि आक्रमक होतो.त्याला झोप लागत नाही.म्हणून त्याचे मानसिक संतुलन बिघडते.माणूस वेडापिसा होतो.ध्वनी प्रदूषणामुळे रक्तदाब वाढतो व हृदयाला आमंत्रण मिळते म्हणून विद्यार्थ्यानी भविष्यात ध्वनी प्रदूषण टाळावे असे आवाहन गोगटे प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.सुनील जाधव यांनी केले.
ध्वनी प्रदूषणाची गंभीरता लक्षात घेऊन प्रशालेत “ ध्वनी प्रदूषणाचे दुष्परीणाम“या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.निवंध स्पर्धेचे उत्तम आयोजन व नियोजन श्री.मोहन सनगाळे , श्री.मंगेश गिरकर यांनी केले.