फोटोग्राफर काशीराम उर्फ अरुण गोविंद कोरगावकर यांचे निधन 

32

कणकवली ( प्रतिनिधी)

 

 फोटोग्राफर काशीराम उर्फ अरुण गोविंद कोरगावकर यांचे निधन 

कणकवली शहरातील नाथ पै नगर येथील रहिवासी व स्क्रीन पेंटिंग व जुन्या पिढीतील फोटोग्राफर काशीराम उर्फ अरुण गोविंद कोरगावकर (७८) यांचे सोमवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. मूळ कसवण गावकरवाडी येथील रहिवासी अरुण कोरगावकर हे गेले अनेक वर्ष व्यवसाया निमित्ताने कणकवली नाथ पै नगर येथे राहत होते. त्यांचे तहसीलदार कार्यालयाच्या मागे तृप्ती डिजिटल वर्क्स या नावाचे दुकान आहे त्यांच्या पश्चात पत्नी चार मुली, दोन जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. मंगळवारी दुपारी कणकवली स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ते स्क्रीन पेंटिंग पेशालिस्ट कुमारी तृप्ती व रुपाली यांचे वडील होत.