देवगड (प्रतिनिधी )
इंग्रजी शिकणे कठीण नाही,फक्त सातत्य आणि सराव आवश्यक – जयंत मनेरीकर
इंग्रजी शिकणे कठीण नाही,फक्त सातत्य आणि सराव आवश्यक आहे.इंग्रजी बोलण्याच्या कोर्सच्या मदतीने आपण स्वतःला अधिक सक्षम करू शकतो आणि जागतिक स्तरावर यश मिळवू शकतो.असे प्रतिपादन कुशल अकॅडमीचे अध्यक्ष श्री.जयंत मनेरीकर यांनी जामसंडे येथे केले.
दीक्षित फाउंडेशन व कुशल अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने जामसंडे श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेच्या नलावडे सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या इंग्लिश कम्युनिकेशन ट्रेनिंग सांगता समारंभादरम्यान ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.यावेळी मुख्याध्यापक श्री.सुनील जाधव ,श्री.राहुल गोगटे ,सौ.वैशाली मनेरिकर आदि मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना मुख्याध्यापक श्री.सुनील जाधव म्हणाले की ,सध्याच्या युगात इंग्रजी ही जगाची मुख्य भाषा झाली आहे.त्यामुळे चांगले इंग्रजी येणे ही काळाची गरज बनली आहे.इंग्रजी भाषेविषयी विद्यार्थ्यांमध्ये भीती निर्माण होते.ही भीती दूर करण्याचे काम दीक्षित फाउंडेशन आणि कुशल अकॅडमीच्या “ इंग्लिश कम्युनिकेशन ट्रेनिंग” या उपक्रमामुळे झाली असल्याचे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी व विद्यार्थी वर्गाने आपली मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाची प्रास्ताविक सौ वैशाली मनेरिकर यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून व कार्यक्रमाच्या सांगता समारंभादरम्यान उपस्थित मान्यवरांचे आभार सौ प्रज्ञा चव्हाण यांनी व्यक्त केले.





