राज्यस्तरीय जिल्हास्तरीय स्पर्धेच्या माध्यमातून जामसंडेचे नाव उंचावणाऱ्या कबड्डीची पंढरी म्हणजे जामसंडे – संदीप साटम

64

 

देवगड (प्रतिनिधी)

राज्यस्तरीय जिल्हास्तरीय  स्पर्धेच्या माध्यमातून जामसंडेचे नाव उंचावणाऱ्या, कबड्डीची पंढरी म्हणजे जामसंडे – संदीप साटम

जामसंडे ही कबड्डीची पंढरी असून जिल्हास्तरीय राज्यस्तरीय स्पर्धांमधून या जामसंडे चे नाव उंचावले आहे.अशा स्पर्धांना प्रोत्साहन देणे हेच कार्य आपले पालकमंत्री नाम.,नितेश राणे करीत असताना या भागाचा सर्वागीण विकास करण्यासाठी पालकमंत्री कटिबद्ध आहेत परंतु अशा मंडळांचे आलेख उंचावणेसाठी त्यांचे विशेष प्रयत्न सुरू असतात असे प्रतिपादन भाजप सरचिटणीस संदिप साटम यांनी केले.जामसंडे येथील कबड्डी स्पर्धा उदघाटन सोहळ्या प्रसंगी बोलताना केले.

या प्रसंगी माजी आमदार अँड अजित गोगटे, मिलिंद साटम, प्रवीण जोग,नरेश डामरी,मंगेश लोके,नगरसेवक शरद ठुकरूल, नगरसेविका तन्वी चांदोसकर, प्रवीण सावंत, योगेश पाटकर, दयानंद पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी गोगटे म्हणाले की, जामसंडे येथे सन्मित्र मंडळाच्या वतीने आजपर्यंत जिल्हास्तरीय ,राज्य स्तरीय तसेच व्यावसायिक कबड्डी बरोबर महाराष्ट्र शासन शिवशाही चषक कबड्डी स्पर्धा आयोजित केल्या यामागे कबड्डीचा प्रसार आणि प्रचार होणे हाच उद्देश होता .आणि कबड्डी हा आपल्या मातीतला खेळ आहे त्यातून आज वाडीवाडीवर कबड्डी संघ तयार झाले आणि तालुक्यात कबड्डीच्या स्पर्धा रंगल्या यामधूनच देवगडचा कबड्डीचा एक चांगला संघ बनला असल्याचे सागितले. यावेळी उपस्थित त्यांनीही या स्पर्धेत शुभेच्छा दिल्या.