गडनदी पुलावर भरधाव ट्रकने दुचाकीला उडवले ;  दहा वर्षाच्या बालकासह महिला गंभीर ; संतप्त कणकवलीकरांनी रोखला महामार्ग 

391

 

कणकवली (प्रतिनिधी)

गडनदी पुलावर भरधाव ट्रकने दुचाकीला उडवले ;  दहा वर्षाच्या बालकासह महिला गंभीर ; संतप्त कणकवलीकरांनी रोखला महामार्ग 

 

एसटी आडवी लावून आडवीला ट्रक  ;  ट्रक चालकाला दिला चोप 
वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रक चालकाने कणकवलीत गडनदी पुलानजीक कणकवली ते हळवल जाणाऱ्या दुचाकीला उडवले. यात दुचाकीवरील महिला व दहा वर्षीय बालक गंभीर जखमी झाला आहे. विशेष म्हणजे हा ट्रकचालक मद्यधुंद असून दुचाकी फरपटत सुमारे दीडशे मीटर अंतरावर हळवल फाट्यावर आणली. हा अपघात गुरुवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास मुंबई -गोवा महामार्गावर विजयभवन नजीक गडनदी पुलावर घडला. हळवल फाट्यावर वारंवार अपघात होत असून याबाबत उपाययोजना होत नसल्याने संतप्त वाहन चालक आणि कणकवलीकरांनी महामार्ग रोखून धरला आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने महामार्गावर लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत .
हळवल येथील एक महिला आपल्या दहा वर्षाच्या मुलासह दुचाकीवरून कणकवली ते हळवल जात होती .विजय भवन नजीक सर्विस रोड वरून ती गडनदी पुलावर जात असताना मागून आलेल्या वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रक चालकाने पुढे जात असलेल्या कसवण एसटीला घासत दुचाकीला उडवले .त्यात महिला आणि तिचा मुलगा दुचाकीवरून फेकले जाऊन गंभीर जखमी झाले . ट्रक चालकाने ट्रक खाली दुचाकी अडकलेली असतानाच ती फरफटत सुमारे दीडशे मिटर अंतरावर हलवळ फाट्यापर्यंत नेली. समोरील एसटी चालकाला हा प्रकार समजताच त्याने पुढे जाऊन एसटी आडवी लावली. तेथे असलेल्या वाहन चालकांनी जखमी महिला आणि बालकाला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात नेले.
दरम्यान हळवल फाट्यावर अपघात झाल्याचे समजतात कणकवलीकरानी धाव घेत मोठी गर्दी केली .अपघात करणाऱ्या ट्रकचालकला चांगला चोप ददिला. पोलीसही घटनास्थळी पोहोचले. मात्र या हळवल फाट्यावर जोपर्यंत ठोस उपाययोजना होत नाहीत तोपर्यंत महामार्गावरून वाहतूक सुरू करू देणार नाही असा पवित्रा घेत महामार्ग रोखून धरल्याने दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
*दक्ष जाधव (10), सोनाली जाधव (27) र.हळवल .दोघेही गंभीर जखमी. कणकवलीत खाजगी रुग्णालयात उपचार सुरू*.