पुणे ते कन्याकुमारी सायकल यात्रा प्रवासादरम्यान  सिंहगड ग्रुपच्या सहकाऱ्यांचे गोव्यात आगमन 

11

 

सावंतवाडी (प्रतिनीधी)

पुणे ते कन्याकुमारी सायकल यात्रा प्रवासादरम्यान  सिंहगड ग्रुपच्या सहकाऱ्यांचे गोव्यात आगमन 

पुणे ते कन्याकुमारी सायकल यात्रा करताना औद्योगिक प्रशिक्षण केंद्र सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष तसेच युनायटेड फेडरेशन औद्योगिक प्रशिक्षण संस्था केंद्रीय सचिव महादेव मालीजी हे आपल्या सिंहगड ग्रुप सहित गोव्यामध्ये त्यांचे आगमन झाले. या सायकल यात्राचे औचित्य साधून ते छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सर्व जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य ते करत आहेत त्याचप्रमाणे प्लास्टिक मुक्त भारत, बेटी बचाओ बेटी पढाओ, गो ग्रीन असा संदेश ते सर्वांना देत आहेत.

त्याचप्रमाणे आगामी काळात त्यांनी 35 देशांना सायकल यात्रा करून भेट देण्याचा संकल्प केला आहे. त्यात ते पहिल्यांदा दुबईला भेट देणार आहे. विशेष म्हणजे हे सर्व सायकल स्वार साठ वर्षे वयोमर्यादेचे आहेत. त्यांचा तो दृढ निश्चय, आत्मविश्वास सर्वाना प्रेरणादायी आहे. ते दिवसाला 150 ते 200 किलोमीटर सायकल प्रवास करतात.या रॅलीतदत्तात्रय मांदळे, सुनील तांबे, चंद्रकांत शिंदे, क्षिति कदम, संदीप नवगिरे, संतोष माडेकर,
महादेव माळी आदी सहभागी होते.गोव्यात त्यांचे स्वागत गोवा सरकारी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र संघटनेचे अध्यक्ष अनिल भोसले व इतर पदाधिकारी तसेच शिवराज्य प्रतिष्ठान गोवा चे अध्यक्ष श्री गोविंद पुंडलिक गोवेकर व सहकारी यांनी पुष्पमाला व छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन त्यांचे स्वागत व सत्कार केला. व पुढील प्रवासासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.