सावंतवाडीत : वैश्य समाजाचा शतक महोत्सवी गौरव सोहळा संपन्न होत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाजाचा वधुवर मेळावा रविवार दि. १२ फेब्रुवारी २०२३ रोजी होणार आहे. मेळाव्याचे यजमानपद सावंतवाडीत आहे. वैश्य समाजाचे शतक महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून शनिवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ४.०० वाजता भव्यदिव्य शोभायात्रा काढण्याचे आयोजन केले आहे. या शोभायात्रेत सहभागी होण्याचे आवाहन समाजामार्फत करण्यात आले आहे.
सर्वेश भिसे, कणकवली महिला आणि पुरुष यांचे डोळ्याचे पारणे फिटणारे ढोलपथक व नेरुर येथील चित्ररथाचा सहभाग असणार आहे. श्री वामनाश्रम स्वामीजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात होईल.
तसेच सायंकाळी ६ ते ८ वा. महिलांसाठी फनि गेम्स, संगीत खुर्ची चे आयोजन केलेले आहे .





