‘ब्राह्मणदेव प्रीमियर लीग २०२३’ क्रिकेट स्पर्धेच समीर नलावडे यांच्या हस्ते उद्धाटन…!

विजेत्यांना २०,००० तर उपविजेत्याना १५,००० रुपये पारितोषिक…!

कणकवली : कणकवलीतील ब्राह्मणदेव मित्र मंडळ परबवाडी आयोजित ब्राह्मणदेव प्रीमियर लीग २०२३ क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी नगराध्यक्ष समीर नलावडे आणि उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेतील विजेत्याला २०,००० हजार रुपये आणि आकर्षक चषक तर उपविजेत्याला १५,००० हजार रुपये आणि आकर्षक चषक देण्यात येणार आहे याशिवाय इतर वैयक्तिक बक्षीसेही देण्यात येणार आहेत.

स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी नगरसेवक संजय कामतेकर, अबीद नाईक, माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे, माजी नगरसेवक दादा परब, प्रकाश परब, शिवाजी परब, सचिन सरंगले आधी अनेक मान्यवर उपस्थित होते. रविवारी स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे.