सावंतवाडी (हेमंत मराठे)
सावंतवाडी राजघराणं व श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या लोककला विभागातर्फे लोककला महोत्सव २०२५ चे . २३ ते २६ जानेवारी दरम्यान आयोजन
सावंतवाडी राजघराणं व श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या लोककला विभागातर्फे लोककला महोत्सव २०२५ च आयोजन करण्यात आले आहे. २३ ते २६ जानेवारी दरम्यान हा महोत्सव सावंतवाडी राजवाडा येथे करण्यात आले आहे. विधी संख्येत, नारायण नमोस्तूते, राखणदार, देवी चंद्रलांबा परमेश्वरी, गिधाड घुबड संग्राम, विजयमणी, मुंबईची मुंबादेवी आदी दशावतार नाट्यप्रयोग सादर होणार असून युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांच्या संकल्पनेतून ‘भरतनाट्यम’ आविष्कार होणार आहे. राज्याचे सांस्कृतिक मंत्री अँड. आशिष शेलार यांना या महोत्सवास आमंत्रित केले आहे. या महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन युवराज लखमराजे भोंसले यांनी केले. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
२३ जानेवारी ते २६ जानेवारी या कालावधीत सायंकाळी ६.३० ते ८ व रात्री ८.३० ते १० या वेळेत राजवाडा सावंतवाडी येथे हा लोककला महोत्सव सादर करण्यात येणार आहे. ७ दशावतारी नाटकांसह युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांच्या संकल्पनेतून ‘भरतनाट्यम’ आविष्कार होणार आहे. यात राजघराण्याच्या शूरवीर राजमातांचा गौरव या प्रयोगातून होणार आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन युवराज लखमराजे भोंसले यांनी केले आहे. याप्रसंगी अँड. शामराव सावंत, प्राचार्य डॉ. दिलीप भारमल, प्रा. दिलीप गोडकर, जयप्रकाश सावंत, डॉ. गणेश मर्गज आदी उपस्थित होते.





