सावंतवाडी (प्रतिनीधी)
एकोसेंसीटीव्ह भागात हे गाव असताना मायनिंगसाठी प्रशासन ही परवानगी कशी देते – संदेश पारकर
साटेली तर्फ सातार्डा येथे बेकायदेशीर उत्खनन सुरू आहे. एकोसेंसीटीव्ह भागात हे गाव असताना मायनिंगसाठी परवानगी मिळतेच कशी ? प्रशासन ही परवानगी कशी देते असा सवाल उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी केला. तसेच याठिकाणी कायदा धाब्यावर बसवून मायनिंग होत असेल तर या अनधिकृत मायनिंगला माझा विरोध राहील, हे बंद न झाल्यास जन आंदोलन उभारु असा इशारा दिला.तर स्थानिकांनी मायनिंगला विरोध केला असता सरपंचांसह लोकप्रतिनिधींंना धमक्या दिल्या जात असून जिल्ह्यात वाल्मिक कराड तयार व्हायला नको असे मत व्यक्त केले. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.



