कणकवली (तुळशीदास कुडतरकर)
परमहंस भालचंद्र महाराज यांच्या जन्मोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ…!
विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी कनकनगरीत वातावरण भक्तिमय
भालचंद्र महाराज यांची मूर्ती व समाधी स्थळी विविध फुलांच्या सहाय्याने केली आकर्षक सजावट
योगियांचे योगी, अनंतकोटी ब्रम्हांडनायक, राजाधिराज परमहंस भालचंद्र महाराज असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान परमहंस भालचंद्र महाराज यांच्या १२१ वा जन्मोत्सव सोहळ्याला गुरुवारी भक्तीमय वातावरणात प्रारंभ झाला.यावेळी महोत्सवाच्या पहिल्या दिवशी भालचंद्र महाराज यांच्या दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली होती.यावेळी “दिगंबरा, दिगंबरा, भालचंद्र बाबा दिगंबरा, भालचंद्र गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी.”च्या जयघोषाने कनकनगरी दुमदुमून
कठोर तपसाधनेत मग्न राहूनही बाबांनी असंख्य भाविक भक्तांची दुःखे, वेदना व चिंता दूर केल्या. बाबा आपल्या कृपानुभवाची प्रचिती आजही भाविक भक्तांना सदोदीत देत असतात. अशा या भक्तवत्सल, परमकृपाळू योगीराज परमहंस भालचंद्र महाराज यांचा जन्मोत्सव आज गुरुवारी पहाटे भालचंद्र महाराज यांच्या समाधी स्थळाचे विधिवत पूजन करण्यात आले. पहाटेच्यावेळी भक्तांनी काकड आरती करत वातावरण भक्तिमय केले.समाधीपूजा, अभिषेक. स.८ ते १२.३० वा. सर्व भक्त कल्याणार्थ परमहंस भालचंद्र दत्त पवमान स्वाहाकार हा विधी श्री .व सौ. कामत दाम्प्त्याच्या हस्ते कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.स्त्यानारायण महापूजा देखील झाली. यावेळी भालचंद्र संस्थांचे अध्यक्ष व कमिटीचे पदाधिकारी व भाविक भक्त उपस्थित होते.
दुपारी भालचंद्र महाराज यांची महाआरती करण्यात आली.आरतीला देखील मोठी गर्दी पाहायला मिळाली. दुपारच्या सत्रात भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. भजनी कलाकारांनी भजने सादर करून वातावरण भक्तिमय केले. सायंकाळच्या सत्रात शाळा नं.३ च्या विद्यार्थ्यांचे गुणदर्शनपर विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.यावेळी उपस्थित नागरिकांनी भरभरून दाद देत.बाल कलाकारांची मने जिंकली.
परमहंस भालचंद्र महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त संस्थात परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. भालचंद्र महाराज यांची मूर्ती व समाधी स्थळ विविध फुलांच्या सहाय्याने सजविण्यात आले आहे.भालचंद्र महाराजांचे हे मनमोहक दृष मनामध्ये मोबाईल मध्ये साठवत आहेत. या उत्सवामुळे शहरात भक्तीमय वातावरण आहे.महोत्सवाच्या पहिल्या दिवशी भालचंद्र महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी संस्थान परिसरात गर्दी दिसून आली.
उत्सवानिमित्त संस्थान तर्फे पुढील चार दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम तर शहरातील नागरिकांच्या माध्यमातून विविध स्पर्धा पार पडणार आहेत.
शुक्रवारी होणारे कार्यक्रम…!
१७ रोजी पहाटे ५.३० ते ८ समाधीपूजन, काकडआरती,अभिषेक सर्व भक्त कल्याणार्थ परमहंस भालचंद्र दत्त पवमान स्वाहाकार हा विधी दुपारी १२.३० ते ३.०० आरती व महाप्रसाद दुपारी भजने सायंकाळी राधाकृष्ण संगीत साधना प्रस्तुत सौ. विणा दळवी आणि सहकारी, होडावडे यांचा ‘स्वरसंध्या’ कार्यक्रम तर रात्रौ आरती असे कार्यक्रम होणार आहेत.






