अजब एसटी प्रशासनाचा गजब कारभार ! चालकाची मानसिकता नसताना दिली पुणे ड्युटी ; अस्वस्थ वाटू लागल्याने नेले कोल्हापूर सीपीआरमध्ये ; चालकाचा ब्लड प्रेशर वाढला नशीब बलवत्तर म्हणून अनर्थ टळला
सावंतवाडी वरून सकाळी साडेआठ वाजता सुटणारी सावंतवाडी पुणे शिवशाही गाडी काल उशिराने धावली त्याचं कारण म्हणजे चालक आणि प्रशासन यामधील वाद. मात्र चालकाने प्रशासन बरोबर वाद का घातला याचाही विचार होणे गरजेचे आहे. सावंतवाडी पुणे ह्या लांब पल्ल्याच्या बस फेरीमध्ये स्क्रू पद्ध (बदली चालक वाहक ची पद्धत) असते. मात्र ती बंद करून एकाच चालकाने सावंतवाडीहून पुण्यापर्यंत एसटी बस चालवून न्यायची नवीन प्रणाली एसटी प्रशासन सुरू केली. यामुळे काल शिवशाहीवरील चालक शिवराम दिनकर मुळीक यांनी आपणाला सदरचा साडेदहा ते अकरा तासाचा प्रवास करणे शक्य नसल्याचे सांगितले. असे असतानाही तुला सावंतवाडी ते पुणे शिवशाही गाडी घेऊन जावं लागेल असे दडपण सदरच्या चालकावर आणल्यानंतर सदरच्या चालकाने आपली तक्रार लेखी स्वरुपात देऊन बस पुण्याच्या दिशेने रवाना केली.एसटी प्रशासनने पुन्हा एकदा त्याच्यावर दडपड आणत त्याला सावंतवाडी पुणे शिवशाही गाडी घेऊन जाण्यास भाग पाडले. याचा परिणाम सदरचा चालक हा शिवशाही एसटी बस घेऊन कोल्हापूरला गेल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागले. यामुळे तेथील एसटी प्रशासनाच्या अधिकाऱ्याने त्याला वैद्यकीय उपचारासाठी कोल्हापूर सीपीआर मध्ये नेले असता त्याचा ब्लड प्रेशर हा वाढण्याचे दिसून आले. एखादा चालक आपली एवढ्या दूर गाडी घेऊन जाण्याची मानसिकता नसल्याचे वारंवार सांगूनही सावंतवाडी आगारातील एसटी प्रशासनाचे अधिकाऱ्यांना प्रवाशांच्या जीवाचा विसर पडला असावा.अधिकाऱ्यांनी घेतलेल्या आडमुठे धोरणामुळे वाटेत एखादी घटना घडली असती आणि त्यात जर प्रवासी दगावले असते तर त्याला जबाबदार कोण?असाही प्रश्न सर्वसामान्य जनतेतून उपस्थित केला जात असून प्रवासी हेच आपले दैवत हे ब्रीदवाक्य असणाऱ्या एसटी प्रशासन ला प्रवाशांच्या जीवाचा विसर पडला की काय असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे एसटी प्रशासन आता तरी टाळ्यावर येऊन नियमाप्रमाणे लांब पल्ल्यांच्या बस फेऱ्यांवरील चालकांना योग्य न्याय देईल का याच प्रतीक्षेत चालक आहेत.तसेच ज्या चालकाने एवढ्या लांब एस टी बस घेवुन जाणे आपल्याला एकट्याला शक्य होणार नाही असे अधिकाऱ्यांना सांगून आपले लेखी म्हणणे देऊनही त्याला बस वर जाण्यास भाग पाडणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली जात आहे.