निसर्गासोबत दृकश्राव्य फितीद्वारे भटकंती

11

निसर्गासोबत दृकश्राव्य फितीद्वारे भटकंती

देवगड (प्रतिनिधी)

देवगड एज्युकेशन बोर्ड संचालित मिलिंद सदानंद पवार शाळेत रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त निसर्गासोबत दृकश्राव्यद्वारे भटकंती हा मुंबईस्थित NATURALIST EXPLORERS AND
FOUNDATION या संस्थेचे सचिन राणे यांनी सादर केला. या कार्यक्रमासाठी पूर्व प्राथमिक
विभागातील इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी उत्साह पूर्वक सहभाग नोंदवला.

 

कार्यक्रमात जैवविविधता, प्राणी, निसर्ग, विशेष करून फुलपाखरांचे जीवन चक्र, ऋतुंविषयी तसेच आपल्याकडे आढळणाऱ्या सापांविषयी आणि वेगवेगळ्या पक्षांविषयी माहिती दृकश्राव्यफितींच्या माध्यमातून अतिशय परिणामकारी पद्धतीने दिली गेली. तिसरी चौथीच्या अभ्यासक्रमामधे समाविष्ट असलेल्या या विषयासंबंधीची माहिती रंजक पद्धतीने मिळाल्याने विद्यार्थ्यांनी त्याचा मनसोक्त आनंद घेतला.

देवगड एज्युकेशन बोर्ड मुंबईचे उपाध्यक्ष तथा रौप्य महोत्सवी समितीचे अध्यक्ष श्री सदानंद पवार,लोकल कौन्सिल सदस्या सौ. अनुश्री पारकर व सर्व शिक्षक उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन श्री. स्वप्निल सुतार यांनी केले.