Home महाराष्ट्र कणकवली कणकवलीत भव्य शोभयात्रेने थोड्याच वेळात होणार पर्यटन महोत्सवाचा शुभारंभ ; इंडियन आयडॉल...

कणकवलीत भव्य शोभयात्रेने थोड्याच वेळात होणार पर्यटन महोत्सवाचा शुभारंभ ; इंडियन आयडॉल विजेता सलमान अली कणकवलीकरांना नाचवणार ; मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार महोत्सवाचा शुभारंभ

15

 

कणकवली, दि.९ जानेवारी (प्रतिनिधी)

कणकवलीत भव्य शोभयात्रेने थोड्याच वेळात होणार पर्यटन महोत्सवाचा शुभारंभ ; इंडियन आयडॉल विजेता सलमान अली कणकवलीकरांना नाचवणार ; मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार महोत्सवाचा शुभारंभ

कणकवली पर्यटन महोत्सव 2025 आजपासून सुरुवात होत असून, या पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने आज कणकवली थोड्याच वेळात शोभायात्रा काढून करण्यात येईल. या पर्यटन महोत्सवात पहिल्याच दिवशी इंडियन आयडॉल विजेता सलमान अली नाईट असल्याने कणकवलीकरांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे, कुडाळ मालवण चे आमदार निलेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या उपस्थित शुभारंभ होणार आहे.
कणकवली शहरातील 17 प्रभागाचे 17 चित्ररथ व त्यानंतर उद्घाटनाचा कार्यक्रम झाल्यावर रात्री सलमान अली या इंडियन आयडॉल विजेत्या सुप्रसिद्ध गायकाच्या आर्केस्ट्रा याने आज शुभारंभाचा पहिला दिवस यादगार ठरणार आहे. या महोत्सवाला सर्वांनी उपस्थित राहवे असे आवाहन कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे.