सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरेला बॅटरी ऑपरेट रिक्षा दाखल

383

 

सावंतवाडी (संपत मराठे)

सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरेला बॅटरी ऑपरेट रिक्षा दाखल

 

शासनाकडून गावागावात ग्रामपंचायतच्या मार्फत स्वच्छता अभियान राबविण्यात येते. या अभियानाला आणखीन मजबुती येऊन स्वच्छतेचे काम आणखीन चांगले प्रकारे करतां यावे यासाठी शासनाकडून कचरा संकलन करण्याकरीता बॅटरी ऑपरेट रिक्षा देण्यात येतं आहेत.

 

यात सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरेला स्वच्छ भारत मिशन अंतर्गत बॅटरी ऑपरेट रिक्षा देण्यात आली असुन याचा शुभारंभ सरपंच सौ मिलन पार्सेकर व उपसरपंच हेमंत मराठे यांच्या हस्ते रिक्षेला पुष्पहार घालून शुभारंभ करण्यात आला. यावेळी सदस्य स्नेहल मुळीक, कृषी मित्र अमित नाईक, विमा एजंट सतीश सातार्डेकर, प्रमोद मुळीक, मारटा फर्नाडीस, निलम खोत, श्रद्धा शिरसाट आदि उपस्थित होते.