तुतारी एक्स्प्रेस मधून पडल्याने तरुणाला गंभीर दुखापत ; २४ वर्षीय तरुण देवगडमधील

72
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"border":2,"transform":2,"effects":1,"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

 

देवगड (प्रतिनीधी)

तुतारी एक्स्प्रेस मधून पडल्याने तरुणाला गंभीर दुखापत ; २४ वर्षीय तरुण देवगडमधील

 

रोहा ग्रामीण रुग्णालय प्राथमिक उपचार करून पुढील उपचाराकरिता एम.जी.एम कामोठे रुग्णालया हलविले
पहाटे मुंबई कडून गोव्याच्या दिशेने निघालेल्या तुतारी एक्स्प्रेस मधून एक तरुण पडल्याने त्याला गंभीर दुखापत झाली आहे.प्रवासा दरम्यान सोबत असलेल्या मित्रांनी ही माहिती माणगाव आरपीएफ यांना माहिती दिली. या घटनेमुळे वातावरण भयभीत झाले आहे.
सकाळी साडेतीनच्या सुमारास मुंबईहून रत्नागिरीच्या दिशेने तुतारी एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या सिंधूदुर्ग देवगड येथील ओमकार राऊत वय वर्ष (२४) हा रोहा व कोलाडच्या दरम्यान एक्सप्रेस मधून पडला असल्याचे त्याच्या सोबत प्रवास करणाऱ्या मित्रांना लक्षात येताच त्याच्या मित्रांनी ही माहिती माणगाव आरपीएफ यांना दिली.लगेचच रोहा पोलीस व तालुक्यातील बाहे गावाचे पोलीस पाटील व SVRSS टीम घटनास्थळी पोहोचले.
तुतारी एक्स्प्रेस मधून पडलेल्या तरुणाला तातडीने रोहा ग्रामीण रुग्णालय येथे उपचार दाखल करण्यात आले.त्याला गंभीर दुखापत झाल्याचे निदान होताच पुढील उपचाराकरिता एम.जी.एम कामोठे येथे हलविण्यात आले आहे.