Home महाराष्ट्र कणकवली किल्ले विजयदुर्गवर २९ रोजी हिंदवी स्वराज्याचा तोफगाडा लोकार्पण सोहळा

किल्ले विजयदुर्गवर २९ रोजी हिंदवी स्वराज्याचा तोफगाडा लोकार्पण सोहळा

32

 

कणकवली दि २५ डिसेंबर (प्रतिनिधी)

किल्ले विजयदुर्गवर २९ रोजी हिंदवी स्वराज्याचा तोफगाडा लोकार्पण सोहळा

खास.नारायण राणे यांचेसह जिल्हाधिकारी यांची उपस्थिती
गड किल्ले संवर्धन संस्था.महाराष्ट्र राज्य कोकण विभाग यांच्या वतीने विजयदुर्ग ता.देवगड किल्ल्यावरील तोफेला तोफगाडा बसवण्याचे भव्य दिव्य आयोजन दि. २९\१२\२०२४ रविवार रोजी करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या शुभहस्ते होणार असून अधिक्षण भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग मुंबईचे अभिजीत आंबेडकर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत.
कार्यक्रमाची सुरवात २८\१२\२०२४ शनिवार दिवशी सांय ६ वा स्थानिक ग्रामस्थांच्या हस्ते भगवा ध्वज तसेच गड देवतांचे पुजनाने होईल. या नंतर शिवप्रभुंच्या जिवनावर काव्यात्मक शिवचरित्र रचन्यार्या कवी भूषण यांचा छंदात्मक काव्य रचनांचा सादरीकरण सोहळा शिवभूषन श्री.भूषण साटम हे करतील व नंतर गडावरील श्री हनुमान मंदिर परिसरात भजनाचा कार्यक्रम होईल. २९\१२\२०२४ रविवार या दिवशी मुख्य कार्यक्रम असेल सकाळी विजयदुर्ग गावाच्या वेशीपासून किल्ल्या पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांची पालखी मिरवणूक काढण्यात येईल पालखी मध्ये मनचे गावचे ढोल पथक, SSS योध्दा १+ पथक बिडवाडी लाठीकाठी व छत्रपती शिवराय राष्ट्र माता जिजाऊ छत्रपती संभाजी महाराज व मावळ्यांची वेशभुशा धारण केलेले मावळे असा लोक असतील. ११ ते दु. १ मुख्य स्टेज कार्यक्रम संपन्न होणार आहे.
या दरम्यान हिंदवी स्वराज्याचा तोफगाडा लोकार्पण कोकणात विविध किल्ल्यावर गड किल्ले संवर्धन करणाऱ्या सामाजिक संस्थांचा सन्मान व नंतर महाराजांचा जीवनपट उलगडून दाखविले जाणारे कार्यक्रम सादर होणार आहेत.२९\१२\२०२४ दिवशी छत्रपती शिवराय व ऐतिहासिक पुस्तकांचे स्टॉल सुद्धा उपलब्ध असणार आहे.
या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून आधीक्षण भारतीय पुरातत्व सर्वेक्षण मूबंई अभिजित आंबेकर,कंजरवेशन असिस्टंन -राजेश दिवेकर, सहाय्यक निरीक्षक राज्य पुरात्वव सर्वेक्षण विभाग विलास वाहने आदी मान्यवरही उपस्थित राहणार आहेत तसेच या तोफगाड्याचे लोकार्पण खासदार नारायण राणे,महाराष्ट्र राज्याचे केबिनेट मंत्री – ना.नितेश राणे, आमदार-निलेश राणे,जिल्हा अधिकारी -अनिल पाटील ,ऐ.पी.आय मनोज सोनवलकर यांचे हस्ते लोकार्पण सोहळा होणार आहे.
कार्यक्रमाला विशेष प्रमूख उपस्थिती श्रीमान रघुजीराजे आंग्रे, सुभेदार- कुणाल दादा मालुसरे, समीरराजे इंदलकर,सरनोबत- अमित दादा गाडे,श्रीमंत दीपक राजे शिर्के,सरनोबत- राजेंद्र मोहिते पाटील, सचिन दादा भोसले आदींसह या कार्यक्रमास महाराष्ट्रातील विविध शहरातून ५०० ते ६०० शिवभक्त येणार असल्याची माहित गड किल्ले संवर्धन संस्था.महाराष्ट्र राज्य कोकण विभाग यांनी दिली. या सर्व कार्यक्रमाला जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहावे असे आवाहन गड किल्ले संवर्धन संस्था कोकण विभागीच्यावतीने करण्यात आले आहे.