माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत इनोव्होत्सव नाविन्यपूर्ण उपक्रम

41

 

कणकवली (प्रतिनिधी)

माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत इनोव्होत्सव नाविन्यपूर्ण उपक्रम

कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई, ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक अग्रगण्य शिक्षण संस्था असून या संस्थेमार्फत माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री. मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ आर्ट्स ण्ड कॉमर्स कनेडी, श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ सायन्स कनेडी आणि बालमंदिर कनेडी, प्रशालेत नेहमीच आगळ्यावेगळ्या उपक्रमांची मेजवानी सादर होत असते. आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत इनोव्होत्सव या उपक्रमाचे आयोजन होत आहे. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या प्रतिकृती बनवलेल्या आहेत. या प्रतिकृतींचे प्रदर्शन शुक्रवार २० डिसेंबर आणि शनिवार २१ डिसेंबर रोजी माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेतील ज्ञानदीप सांस्कृतिक भवन, कनेडी सभागृहामध्ये या प्रतिकृतींची मांडणी करण्यात आलेली आहे.

या उपक्रमामध्ये इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून एकूण ७० पेक्षा जास्त प्रतिकृती तयार केलेले आहेत. आपण तयार केलेल्या प्रतिकृतींची माहिती ते स्वतः देत आहेत. या प्रतिकृतीचे प्रदर्शन उद्घाटनासाठी क.ग.शि.प्र.मंडळ मुंबई अध्यक्ष सतीश सावंत, प्रमुख पाहुणे भिरवंडे गावचे सुपुत्र, कवी व लेखक डॉ. सुनिल सावंत, संजय सावंत, किरण तावडे, शरद पुजारी, महाराष्ट्र पोस्टल कॅरम राष्ट्रीय प्रशिक्षक संजय मेस्त्री, राष्ट्रीय खेळाडू, शालेय समिती चेअरमन श्री. आर. एच. सावंत, श्री. संतोष सावंत, चंद्रशेखर वाळके, बावतीस गोन्सालविस व सर्व संस्था पदाधिकारी, पालक प्रतिनिधी श्री. गंगवणे उपस्थित होते.

या प्रतिकृतीचे प्रदर्शन उद्घाटनासाठी सर्व प्रतिकृतींचे प्रदर्शन विद्यार्थी वर्ग, पालक वर्ग, माजी विद्यार्थी व कणकवली तालुक्यातील सर्व शाळांसाठी हे प्रदर्शन बघण्यासाठी दोन दिवस खुले राहणार आहे. सदर प्रतिकृतींच्या परीक्षणाप्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा, माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती कविता शिंपी, अवटी, सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळ जिल्हा अध्यक्ष काकतकर, श्री. शेवाळे यांनी भेट देवून विद्यार्थ्यांचे कौतुक केले या उद्घाटन कार्यक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक व प्राचार्य सुमंत दळवी, प्रशालेचे पर्यवेक्षक बयाजी बुराण, प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विज्ञान प्रतीकृतींचे सादरीकरण करणारे विद्यार्थी व प्रशालेचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते. या संपूर्ण उद्घाटन कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन व आभार प्रसाद मसुरकर यांनी केले.