कणकवली (प्रतिनिधी)
कणकवली शहरातील कनकनगर व बिजलीनगर येथील केटी बंधाऱ्याला लवकरात-लवकर लोखंडी प्लेट टाकून पाणी अडवा – सुशांत नाईक
कणकवली शहरातील बिजलीनगर व कनकनगर येथील केटी बंधाऱ्याला लोखंडी प्लेट टाकून पाणी अडवा अशी मागणी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी लघु पाटबंधारे विभागाकडे केली आहे. येत्या 15 दिवसात बिजलीनगर व कनकनगर येथील केटी बंधाऱ्याला लोखंडी प्लेट टाकून पाणी अडवा. नदीपात्रातील वाहून जाणारे पाणी प्लेट टाकून अडवल्यावर याचा फायदा आता कणकवली शहरातील नागरिकांना होणार आहे.





