लाईफलाईन फाऊंडेशनतर्फे आचरा येथे हाडांच्या रूग्णांसाठी मोफत तपासणी शिबीर संपन्न ; १०० रूग्णांनी घेतला लाभ

13

 

देवगड : प्रतिनिधी

लाईफलाईन फाऊंडेशनतर्फे आचरा येथे हाडांच्या रूग्णांसाठी मोफत तपासणी शिबीर संपन्न ; १०० रूग्णांनी घेतला लाभ

लाईफलाईन फाऊंडेशन देवगड मार्फत शनिवारी अस्थिरोगांच्या रूग्णांसाठी डॉ.शिवेश्वरकर हॉस्पिटल आचरा येथे हाडांच्या रूग्णांसाठी मोफत तपासणी शिबीर संपन्न झाले.या शिबीराचा १०० रूग्णांनी लाभ घेतला.

 

या शिबीरात हात पाय दुखणे, कंबर दुखणे, सांधे दुखणे, गुडघेदुखी, पुर्वीचे फ्रॅक्चर झालेले रूग्ण, संधीवात अथवा हाडाच्या कोणत्याही प्रकारच्या तक्रारी असनाऱ्या रूग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.ऑर्थाेपेडीक सर्जन डॉ.तन्मय आठवले यांनी या रूग्णांची मोफत तपासणी केली.डॉ.सौ.मंजुषा आठवले व डॉ.शिवेश्वरकर यांनी रूग्णांना मार्गदर्शन केले.या शिबीरात आवश्यक त्या रूग्णांची हाडांचे ठिसुळता मोजण्याची बोन मिनरल डेन्सिटी ही तपासणी तसेच सर्व रूग्णांची कार्डिओग्राम सुविधा मोफत करण्यात आली.ज्या रूग्णांना दम्याची सवय आहे किेंवा वारंवार कफ होतो अशा रूग्णांची पलमोनरी फंक्शन टेस्ट व ब्लड शुगर तपासण्यात आली.सर्व रूग्णांची डोळ्यांची तपासणी मोफत करून ज्यांना मोतीबिंदू आहे त्यांची फेको पध्दतीने बिन टाक्याची इंजेक्शन विरहीत शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात करण्यात येणार आहे व लाईफ लाईन फाऊंडेशन तर्फे आयोजित करण्यात येणाèया समाजउपयोगी उपक्रमाचा भाग म्हणून भविष्यात अधिकाधिक वैद्यकीय शिबीरे भरविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी डॉ.रिया आठवले यांनी दिली.