Home महाराष्ट्र कणकवली कोळोशी येथे मुंबईतील सेवानिवृत्त पोलिसाची हत्या ; एक संशयित ताब्यात ; कोळोशी...

कोळोशी येथे मुंबईतील सेवानिवृत्त पोलिसाची हत्या ; एक संशयित ताब्यात ; कोळोशी वरचीवाडी येथील घटना

409

 

 

कणकवली दि २८ नोव्हेंबर (प्रतिनिधी)

कोळोशी येथे मुंबईतील सेवानिवृत्त पोलिसाची हत्या ; एक संशयित ताब्यात ; कोळोशी वरचीवाडी येथील घटना

 

कणकवली तालुक्यातील कोळोशी वरचीवाडी येथे सेवानिवृत्ती घेतलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची हत्या झाली आहे. आज सकाळी हा प्रकार उघडकीस आला. विनोद मधुकर आचरेकर (वय ५५) असे त्याचे नाव आहे. विनोद आचरेकर यांनी नुकतीच मुंबई पोलीस खात्यामधून स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर गेले दोन दिवस ते एकटेच आपल्या कोळोशी वरचीवाडी येथील घरी राहण्यास आले होते. आज सकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या डोक्यावर मोठ्या जखमा आहेत. दरम्यान आचरेकर यांच्या मृत्यूची माहिती पोलीस पाटील संजय गोरुले यांनी कणकवली पोलिसांना दिली.

त्यानंतर कणकवली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. या घटनेचा अधिक तपास कणकवली पोलीस उपनिरीक्षक हडळ करत आहेत.