कणकवली / प्रतिनिधी
भाजपा प्रदेशाध्यक्षांनी केले आमदार नितेश राणे यांचे अभिनंदन
भारतीय जनता पक्षाचे कणकवली विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार नितेश राणे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. मुंबई येथील प्रदेश कार्यालयात झालेल्या या भेटी वेळी श्री. बावनकुळे यांनी आमदार नितेश राणे यांनी विक्रमी मताधिक्यासह केलेल्या हॅट्रिक बद्दल त्यांना शुभेच्छा देत अभिनंदन केले.





