कणकवली दि १७ नोव्हेंबर (प्रतिनिधी)
कनेडी बाजारपेठ येथे भाजप महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांची भव्य प्रचार रॅली
भेटीगाटी घेत, संवाद साधत नितेश राणे यांनी कमळ निशाणी समोरील बटन दाबून मतदार करण्याचे जनतेला केले आवाहन
कनेडी बाजारपेठ येथे भाजप महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांची भव्य प्रचार रॅली आज असंख्य कार्यकर्ते आणि जनतेच्या उपस्थितीत संपन्न झाली. कार्यकर्त्यांचा अपूर्व उत्साह त्यात जनतेने घेतलेला सहभाग लक्षवेधी ठरला.





