देवगड येथील सागर सुरक्षा रक्षक संदेश बाबी नारकर(३६) यांचे अल्पशा आजाराने गुरूवार दि. १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वा.सुमारास गोवा बांबुळी रूगण्यालयामध्ये निधन झाले.
त्यांचा पश्चात पत्नी,मुलगा, भाऊ, भावजय असा परिवार आहे.गेली ९ वर्षे ते सागर सुरक्षा रक्षक म्हणून देवगडमध्ये सेवेत होते.सामाजिक व सांस्कृतिक कार्यात त्यांचा मोठा सहभाग होता.त्यांचा निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.
नाडण गावी त्यांचा पार्थिवावर गुरूवारी सायंकाळी ४.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी मत्स्यव्यवसाय आयुक्त, मत्स्यव्यवसाय परवाना अधिकारी, देवगडमधील सागर सुरक्षा रक्षक, मत्स्यव्यवसाय विभागाचे कर्मचारी यांनी अंत्यदर्शन घेतले.