जामसंडे येथील श्रीकृष्ण मंदिरामध्ये निता निळकंठ दिक्षित स्मृती प्रित्यर्थ दिक्षित फाउंडेशनच्यावतीने किर्तनमाला उत्साहात संपन्न 

9

 

देवगड (प्रतिनिधी)

 

जामसंडे येथील श्रीकृष्ण मंदिरामध्ये निता निळकंठ दिक्षित स्मृती प्रित्यर्थ दिक्षित फाउंडेशनच्यावतीने किर्तनमाला उत्साहात संपन्न 

जामसंडे येथील श्रीकृष्ण मंदिरामध्ये निता निळकंठ दिक्षित स्मृती प्रित्यर्थ दिक्षित फाउंडेशनच्यावतीने 8 ते 10 नोव्हेंबर रोजी किर्तनमालेचे आयोजन करण्यात आले होते. या किर्तनमालेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळून किर्तनमाला उत्साहात संपन्न झाला.

किर्तनकार ह.भ.ज. कैलास बुवा खरे यांनी 3 दिवस श्रीराम हनुमान युध्द,शंभुराजे आणि खंडोबा बल्हाळ व आदयक्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके या विषयावरती किर्तनाच्या माध्यमातून त्यांनी प्रबोधनात्मक मार्गदर्शन केले. यावेळी या किर्तनमालेच्या वेळी देवगड तालुक्यातील ह.भ.प. वासुदेव बुवा कुळकर्णी, ह.भ.प. मधुकर बुवा गोगटे, ह.भ.प. श्रीकृष्ण बुवा घाटे, ह.भ.प. शरदचंद्र बुवा सातावळेकर, ह.भ.प. कमलाकर बुवा पाटणकर, ह.भ.प. आरतीताई बापट, ह.भ.प. नंदकुमार गोगटे या किर्तनकारांचा देखील सत्कार करण्यात आला.

तीन दिवस चाललेला हा किर्तनमाला कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला. खरे बुवा यांनी तीनही दिवस उपस्थित श्रोते वर्गाला मंत्रमुग्ध केले. गेल्या दहा वर्षापुर्वी पर्यंत नियमित चालु असलेल्या या किर्तन परंपरेला दिक्षित फाउंडेशनच्या प्रयत्नाने पुन्हाही किर्तनमाला सुरु करण्यात आली असून पुढील दरवर्षी अखंडित चालू राहणार असल्याचेही दिक्षित फाउंडेशनचे सर्वेसर्वा निरंजन दिक्षित यांनी सांगितले.