तुमचे प्रश्न हे माझे समजून न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत राहणार – बंदेनवाज खाणी

22

 

कणकवली, १० नोव्हेंबर (प्रतिनिधी)

तुमचे प्रश्न हे माझे समजून न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत राहणार – बंदेनवाज खाणी

सर्व समाजाच्या अडचणी, समस्या सोडविण्यासाठी तसेच स्थानिक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आपल्या हक्काच्या उमेदवाराला निवडून द्या, तुमचे प्रश्न हे माझे समजून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासाठी कार्यरत राहणार आहे. आतापर्यंत नेहमीच सर्वच राज्यकर्त्यांनी अल्पसंख्यांक समाजाच्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. मात्र आता वेळ आली आहे. या राज्यकर्त्यांनी त्यांनी न केलेल्या कार्याचा जाब विचारण्याची, मतपेटीतून आपल्या समाजाची एकी दाखवून देण्याची वेळ आली आहे. ही ताकद दाखवा, असे आवाहन कणकवली विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार बंदेनवाज खानी केले आहे.

 

कणकवली विधानसभा मतदार संघातील कणकवली देवगड आणि वैभववाडी तालुक्यातील प्रचाराची पहिली फेरी पूर्ण केल्यानंतर बोलताना अपक्ष उमेदवार नवाज खानी म्हणाले, सर्व समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव
तत्पर राहणार आहे. मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण मिळावे हा आपला हक्कच आहे. हे आरक्षण मिळवून देण्यासाठी शासन व न्यायालयात सुरु असलेल्या लढ्यात प्रत्यक्ष सहभागी होऊन न्याय मिळेपर्यंत लढत राहणार आहे. अल्पसंख्यांक समाजाला तातडीने वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी विशेष रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील.

 

सरकारी तसेच सार्वजनिक संस्थामधील रिक्त पदांवर सर्व समाजातील होतकरु व शैक्षणिक पात्रता धारकांना सामावून घेण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे. अल्पसंख्यांक समाजातील मुलांना देश विदेशात नोकरीच्या संधी प्राप्त होण्यासाठी मार्गदर्शन शिबीर तसेच करियर गाईडन्स शिबिर राबविण्यासाठी नियोजन करण्यात येणार आहे. समाजाच्या उन्नतीसाठी कार्यतप्तर कार्यकर्ता म्हणून काम करणार असल्याचे कणकवली विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार वंदेनवाज खानी यांनी सांगितले.