कुडाळ येथील कोर्टाच्या निविदेसाठी राणेंच्या कार्यकर्त्यांकडून फोन – परशुराम उपरकर

10

 

कणकवली, दि. १० नोव्हेंबर (प्रतिनिधी)

 

कुडाळ येथील कोर्टाच्या निविदेसाठी राणेंच्या कार्यकर्त्यांकडून फोन – परशुराम उपरकर

सिंधुदुर्गात नारायण राणे यांचे दोन्ही पुत्र विकासकामांचा निधी आणला असे सांगतात. मात्र, कुठलीही विकासकामे सुरु झालेली नाहीत. कुडाळ कोर्टाच्या बांधकामाच्या निविदेसाठी टेंडर भरलेल्या ठेकेदाराला थेट फोन करुन मी निलेश राणेंच्या कार्यालयातून परब बोलतोय, ही निविदा भरु नका असे सांगत आहेत. तर दुसरा कार्यकर्ता आनंद शिरवलकर हा निलेश राणे यांच्या मतदारसंघातील हे काम आहे. असे सांगून धमकावण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे राणेंच्या कार्यकर्त्यांकडून निविदा मॅनेज करण्यासाठी ठेकेदारांना धमक्या जात या ऑडीओ रेकॉडिंगमुळे स्पष्ट होत असल्याचे आरोप माजी आ. परशुराम उपरकर यांनी केला.

 

कणकवली येथील विजय भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.या पत्रकार परिषदेत श्री. उपरकर यांनी संबंधित दोन्ही फोनचे ऑडीओ रेकॉर्डिंग माध्यमांसमोर सादर केले. अशा पध्दतीने राणेंची दोन्ही मुले ठेकेदारीबाबत काम करतात मग निकृष्ठ दर्जाची ती कामे होतात. नवनवीन तरुण ठेकेदार आपापल्यापरीने कामे मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. मात्र, कोणतेही लोकप्रतिनीधी नसताना निलेश राणेंचे कार्यकर्ते ठेकेदारांना धमकावून निविदा मॅनेज करण्याचं काम करत आहेत.

त्यामुळे आगामी काळात या विधानसभा निवडणूकीत राणेंच्या मुलाकडून लोकांना अशा पध्दतीने त्रास देवून ठेकेदारांकडून पैसे गोळा केले जातात. व तेच पैसे निवडणूकांमध्ये वापरले जातात. राणेंची दोन्ही मुले सोज्वळ दाखवून विकासाला ध्यास दाखवत आहेत. एक मुलगा माझ्या बापाचा पराभव झाला त्याचा वचपा काढायचा आहे हे मतदारांना सांगत आहे मात्र, त्रास देणा-या या राणेंच्या मुलाला रोखलं पाहिजे. राणेंची घराणेशाही संपवण्यासाठी तीन्ही विधानसभेत मशाल चिन्हावरील उमेदवारांना मतदान केलं पाहिजे. असे आवाहन परशुराम उपरकर यांनी केले.