कणकवली/ प्रतिनिधी
कलमठ अपक्ष ग्रामपंचायत सदस्या नजराणा शेख यांचा भाजपात प्रवेश ; आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश
कणकवली तालुक्यातील कलमठ येथे आमदार नितेश राणे यांचा गाव भेट कार्यक्रम संपन्न झाला, यादरम्यान कलमठ ग्रामपंचायतच्या अपक्ष ग्रामपंचायत सदस्या नजराणा शकील शेख यांनी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश केला.
यापूर्वी नजराणा शेख या दोन वर्षे अपक्ष सदस्य म्हणून काम करत होते. मात्र अपक्ष राहून एकही विकासकामे गावात होत नसल्याने आमदार नितेश राणे यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रभावित होऊन भाजपामध्ये प्रवेश केल्याचे सांगितले. आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून कलमठ गावात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाले आहेत. गावचा विकास आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून होऊ शकतो असा विश्वास त्यांना असल्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले.





