आता.. ठरलयं नक्की, हॅट्रिक पक्की च्या दिल्या भाजपा पदाधिकारी घोषणा ; आमदार नितेश राणे यांच्या प्रचाराचा देवगडात शुभारंभ
ग्रामदैवत श्री दीर्बादेवी रामेश्वरचे दर्शन घेत माजी आमदार अँड अजित गोगटे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शहरातील प्रचाराचा झाला शुभारंभ
कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार नितेश राणे यांच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची गावभेट फेरी जवळपास पूर्ण झाली आहे. देवगड जामसंडे शहराचा काही भाग राहिला आहे. त्याला देखील आजपासून सुरुवात झाली आहे. आमदार नितेश राणे यांच्यासोबत गावभेट कार्यक्रमात आपण स्वतः देखील होतो. एकूण गावागावातलं वातावरण पाहता प्रचंड उत्साह विशेषतः महिला मतदारांमधून दिसून येत आहे. या निवडणुकीत आमदार नितेश राणे कोणावरही टीका करत नाहीत. केंद्र व राज्य सरकारच्या ज्या योजना आहेत त्याची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवली जात आहेत.या योजनेचे प्रत्येक घरात आता लाभार्थी देखील आहेत. विकासाच्या मुद्द्यावर ते मतदारांशी संवाद साधत आहेत. मागील निवडणुकीपेक्षा व लोकसभेत मिळालेल्या मतापेक्षा दुप्पटीने मताधिक्य आमदार नितेश राणे यांना मिळेल असा उत्साह सर्व मतदारांमधून दिसून येत आहे असा विश्वास माजी आमदार अँड अजित गोगटे यांनी व्यक्त केला.
महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे यांच्या देवगड जामसंडे शहरातील प्रचाराचा शुभारंभ देवगड जामसंडेचे ग्रामदैवत श्री दीर्बादेवी रामेश्वर यांचे दर्शन घेऊन करण्यात आला.तसेच मंदिरासमोर प्रचाराचा नारळ देखील माजी आमदार अँड अजित गोगटे यांच्या हस्ते वाढविण्यात आला. यावेळी भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी ठरलंय नक्की हॅट्रिक पक्की हा नाराज देखील उपस्थित भाजपा पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आला.