सावंतवाडी (मंगल कामत)
माझा लढा जनसामान्याच्या न्याय हक्कासाठी – सुनील पेडणेकर
सावंतवाडी विधानसभा क्षेत्रामध्ये मी माझी उमेदवारी कायम ठेवली आहे. माझा लढा जनसामान्याच्या न्याय हक्कासाठी आहे. काही लोकांनी सिंधुदुर्ग जिल्हा लुटून अक्षरशः अवैध मार्गाने खोर्याने पैसा कमावला आहे. त्याची उधळपट्टी विधानसभा निवडणूकीत नक्की होणार. मात्र, जनतेने आता फसव्या लोकांपासून सावध राहावे अशी टीका अपक्ष उमेदवार, सुनील पेडणेकर यांनी केली आहे.





