देवगड (प्रतिनिधी)
महाराष्ट्र दिव्यांग महिला क्रिकेट संघामध्ये
दीक्षा तेली -परब यांची निवड
दहीबावची दिक्षा तेली ४ डिसेंबर रोजी भोपाळ येथे राष्ट्रीय दिव्यांग महिला क्रिकेट स्पर्धेत खेळणार
दिव्यांग क्रिकेट कंट्रोल बोर्ड ऑफ इंडियाच्या अंतर्गत भोपाळ मध्ये ४ डिसेंबर ते ६ डिसेंबर रोजी राष्ट्रीय दिव्यांग महिला क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेत महाराष्ट्र,मध्य प्रदेश , झारखंड ,आणि जम्मू काश्मीरच्या महिला संघ सहभागी होणार आहे.
मुंबई येथील सराव शिबिरात महाराष्ट्र दिव्यांग महिला क्रिकेट संघामध्ये
दहीबांव येथील दीक्षा तेली -परब यांची निवड करण्यात आली आहे. अपघातानंतर झालेल्या दिव्यांग तत्त्वावर दीक्षा तेली परब यांनी मात करून महाराष्ट्र संघासाठी सराव करत आहे, या स्पर्धेत सिंधुदुर्गची कन्या म्हणून मलाही महाराष्ट्र राज्यासाठी खेळण्याची संधी मिळणार आहे, याचा मला व कुटुंबातील सर्वांना आनंद आहे.
साहस प्रतिष्ठान,सिंधुदुर्ग च्या संस्थापिका व अध्यक्षा.तसेच दिव्यांग क्रिकेट कंट्रोल बोर्ड ऑफ इंडियाच्या पश्चिम भारत प्रमुख रुपाली पाटिल भगवान तलवारे, डॉ. सरिन,महिला कोच दिपाली पवार, रत्नागिरी यांचे मार्गदर्शन लाभले,दिव्यांग व्हीलचेअर क्रिकेट असोसिएशन मुंबईचे रमेश सरतापेयांनी क्रिकेटचे प्रशिक्षण दिलें अशा प्रतिक्रिया दीक्षा तेली परब यांनी दिल्या आहेत.





