कणकवली दि. ५ नोव्हेंबर (प्रतिनिधी)
आ. नितेश राणे, संदेश पारकर यांनी मला हलक्यात घेवू नये ;आता मी उमेदवार म्हणून लढणार आणि जिंकणारही आहे – नवाज खाणी
विरोधकांना मी उमेदवारी अर्ज मागे घेणार अशी स्वप्न पडली होती. मात्र, 4 तारीख उमेदवारी अर्ज मागे घेण्याची गेली आहे. आता मी उमेदवार म्हणून लढणार आणि जिंकणारही आहे. सोमवारी ज्या अल्पसंख्यांक बांधव मला ओळखत नाही, असे म्हटले पण त्यांना माझ्यावर बोलण्याची वेळ आली आहे. जे बोलणारे होते, ते उबाठाचे कार्यकर्ते आहेत. संदेश पारकर यांनाचा नितेश राणे यांनी उभ केलं आहे, असा माझा आरोप आहे. त्याबाबत येत्या 10 तारीखला कोण कोणाचा कार्यकर्ता ? त्याचा पोलखोल करणार आहे. आ. नितेश राणे, संदेश पारकर यांनी मला हलक्यात घेवू नये असा इशारा कणकवली विधानसभेचे अपक्ष उमेदवार नवाज खानी यांनी दिला आहे.
कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते, यावेळी अल्पसंख्यांक नेते सादिक धुपावकर, साईल चौगुले, सादिक खतीब, रोहित पठाडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. अपक्ष उमेदवार नवाज खाणी म्हणाले, माझ्या अल्पसंख्यांक बांधवांनी मला सल्ला देण्यापेक्षा मी म्हणतो, तुम्ही समाजासाठी मला पाठींबा देण्याची भूमिका घ्या. मला जिंकून आणण्यासाठी काम करा. मी सर्व समाजाचे नेतृत्व करीत आहे. मला सगळ्या समाजाचा पाठिंबा मिळत आहे. सर्व धर्म समभाव, एकात्मता राखण्यासाठी मी काम करत आहे. तिरंगा ध्वजाचा भगवा, सफेद, हिरवा रंग आहे, ऐक्य राहण्यासाठी मी लढत आहे. पारकरांनी नितेश राणेंनी मला उभे केल्याचा आरोप होता, त्याचा मी खुलासा केला आहे. आता नितेश राणेंनी संदेश पारकर यांना उभे केले आहे, कोण कोण कोणाचा माणूस आहे, येत्या 10 तारीखला उघड करणार आहे त्यावेळी झोप उडेल अशा इशारा त्यांनी दिला आहे.
प्रचारादरम्यान चांगला प्रतिसाद –
कणकवली विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून मी प्रचार करत आहे. सकाळी उठल्यावर मुस्लिम समाज आणि सर्व मित्र परिवार भेटण्यासाठी येत आहेत. अनेकांचे फोन येत आहेत, सर्वधर्म समभाव ठेवल्याने सर्वांचा पाठींबा मला मिळत आहे. अखंड भारत रहावा, सर्व हिंदू-मुस्लिम गुण्यागोविंदाने रहावे. देशासाठी सर्व समाजाचे बलिदान दिले आहे. सर्वांना एकत्र घेवून देश पुढे गेला पाहिजे ही माझी भूमिका आहे.





