सावंतवाडी (मंगल कामत)
सावंतवाडीत विधानसभेचा सामना रंगणार ; केसरकर ,तेली ,विशाल परब,अर्चना घारे परब कशी होणार चौरंगी लढत
विधानसभा निवडणुकीसाठी एकूण सहा उमेदवार रिंगणात उरले आहेत. यामध्ये युतीकडून दीपक केसरकर तर आघाडी करून राजन तेली यांच्यासह बंडखोरी केलेले अर्चना घारे-परब, विशाल परब, सुनील पेडणेकर आणि दत्ताराम गावकर या अपक्षांचा समावेश आहे.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या अर्चना घारे व महायुतीच्या विशाल परब यांनी बंडांचा झेंडा हाती घेतला होता. हे दोघे आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार का ? याकडे सर्वांचा लक्ष होता. मात्र, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी तीन वाजेपर्यंत या दोघांकडून आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला नसल्याने सावंतवाडी मतदारसंघांमध्ये आता चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. मतदारसंघात एकूण दोन लाख तीस हजार दोन एवढे मतदार असून त्यामध्ये महिला मतदार 1 लाख 15 हजार 354 तर पुरुष मतदार 1 लाख 14 हजार 648 एवढे आहेत. प्रत्येक तालुक्याचे मतदार लक्षात घेता दोडामार्ग मध्ये 40 हजार 754 वेंगुर्ल्यामध्ये 67 हजार 985 तर सावंतवाडीमध्ये सर्वात जास्त म्हणजे 1 लाख 21 हजार 263 एवढे मतदार आहेत.





