देवगड (स्वप्नील लोके)
६ नोव्हेंबर रोजी कुणकेश्वर येथे कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट आयोजित शिवकालीन शस्त्र प्रदर्शन
श्री देव कुणकेश्वर व छत्रपती शिवरायांचे नाते हे ऐतिहासिक आहे. छत्रपती शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळात असणारे अमात्य नारो निळकंठ यांची समाधी कुणकेश्वर मंदिराच्या सर्वाधिक निकट स्थानी आहे. श्री देव कुणकेश्वर मंदिराचा जिर्णोद्धार हा छत्रपतींच्या आज्ञेने झालेला आहे. छत्रपती शिवराय हा कुणकेश्वर ग्रामस्थांचा अभिमानाचा विषय आहे. दिनांक ६ नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा यावेळी देवस्थान ट्रस्टच्या हॉलमध्ये शिवकालीन शस्त्र प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रदर्शनीची वैशिष्ट्ये :-
• व्याख्यान
• शिवशंभू विचार दर्शन,प्रदर्शन
• शिवकालीन शस्त्र प्रदर्शन
• शिवकालीन नाणी प्रदर्शन
• मोडी दस्तऐवज
• प्राचीन खेळ
• छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित पुस्तक विक्री





