निवडणूक पार्श्वभूमीवर मतदान केंद्र व लॉजची पोलीसांनी केली तपासणी ; नांदगाव,तळेरेत केली तपासणी

24

 

कणकवली दि 2‌ नोव्हेंबर (प्रतिनिधी)

निवडणूक पार्श्वभूमीवर मतदान केंद्र व लॉजची पोलीसांनी केली तपासणी ; नांदगाव,तळेरेत केली तपासणी

२० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर कणकवली पोलीस यंत्रनेकडून मतदान केंद्रावर भेट देत आढावा घेतला जात आहे. सर्व बाजूंनी तपासणी केली जात आहे. तसेच लॉज ची ही तपासणी निवडणूक पार्श्वभूमीवर केली जात आहे.

या अनुषंगाने कणकवली तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावर असलेल्या नांदगाव , तळेरे येथे कणकवली पोलीस ठाण्यातील ए.पी.आय. डॉ .ज्ञानेश्वर सावंत यांनी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर भेट देत नांदगाव पोलीस पाटील वृषाली मोरजकर यांच्या कडून आढावा घेत होणाऱ्या निवडूक अनुषंगाने सुचनाही दिल्या आहेत.

तसेच तळेरे मतदान केंद्र तसेच लॉज या ठिकाणी भेट देत तपासणी करण्यात आली आहे. यावेळी हवालदार चंद्रकांत झोरे, पोलीस कॉन्स्टेबल शिंदे,तळेरे पोलीस पाटील आदी उपस्थित होते.