आगीत जळालेल्या बेकरीची जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी केली पाहणी

11

 

कणकवली दि.१ नोव्हेंबर (प्रतिनीधी)

आगीत जळालेल्या बेकरीची जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी केली पाहणी

कणकवली शहरातील नामांकित असलेल्या पटवर्धन चौक येथिल आर बी बेकरी आणि बर्डे मेडिकल व राजू गवाणकर यांच्या कार्यालयाला 1 नोव्हेंबर रोजी 4 वाजता लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

 

तसेच या ऐन दिवाळीच्या तोंडावर लक्ष्मीपूजना दिवशी घडलेल्या या घटनेबाबत दुःख देखील व्यक्त केले.

 

यावेळी त्यांच्यासोबत माजी नगरसेवक रुपेश नार्वेकर, वैभव मालंडकर यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.