कणकवली शहरातील आर बी बेकरीला लागली आग; अन्य दोन दुकानांना बसला फटका :आर बी बेकरी जळून पूर्णता बेचिराख ; लाखोंचे नुकसान

146

कणकवली दि ‌१ नोव्हेंबर (प्रतिनिधी)

 

कणकवली शहरातील आर बी बेकरीला लागली आग; अन्य दोन दुकानांना बसला फटका :आर बी बेकरी जळून पूर्णता बेचिराख ; लाखोंचे नुकसान 

शहरात पटवर्धन चौकात असलेल्या आरबी बेकरीला शुक्रवारी (आज) पहाटे ४ वा. च्या सुमारास लागलेल्या आगीत आर बी बेकरी जळून पूर्णता बेचिराख झाली. यावेळी तेथे बाजूला असलेल्या राजू गवाणकर यांचे कार्यालय व बर्डे मेडिकलला देखील आगीचा फटका बसला.

घटनेची माहिती मिळताच कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह अनेक नागरिकांनी धाव घेतली. आगीचा भडका एवढा जोरात होता की, या आगीत चौकातील इतर दुकाने देखील आगीच्या भक्षस्थानी पडली.

कणकवली नगरपंचायतचा बंब येऊन देखील आग आटोक्यात येत नव्हती. अखेर कुडाळ एमआयडीसी व मालवण नगरपंचायतचां बंब बोलाविण्यात आला. त्यानंतर आग काही प्रमाणात आटोक्यात आली. मात्र ऐन दिवाळीत लक्ष्मीपूजन दिवशी ही दुकाने अक्षरशः बेचिराख झाली होती. यामध्ये लाखोंचे नुकसान झाले असून ही आग शॉर्ट सर्किट झाल्याने लागल्याचे बोलले जात आहे.