कुणकेश्वर मंदिरात २ नोव्हेंबर रोजी दीपोत्सव २०२४ सोहळा

20

देवगड (स्वप्नील लोके)

कुणकेश्वर मंदिरात २ नोव्हेंबर रोजी दीपोत्सव २०२४ सोहळा

 

श्री देव कुणकेश्वर मंदिर येथे प्रतिवर्षाप्रमाणे दीपावली पाडवा शनिवार दिनांक 2 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी ६ वाजता दीपोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे.

या दीपोत्सवात होणारे कार्यक्रम सायंकाळी ६ ते ८;३० स्वरसंध्या सांजमैफल, सायंकाळी ७ वाजता मुख्य गाभाऱ्यात दीप प्रज्वलन करून दीपोत्सवास प्रारंभ,मंदिर परिसरातील दीपप्रज्वलन, रात्री ८:३० ते ९ उपस्थित मान्यवरांचा सन्मान सोहळा, ९ ते ९:३० पालखी प्रदक्षिणा सोहळा आदी कार्यक्रम संपन्न होणार असल्याची माहिती श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने देण्यात आली आहे.

या कार्यक्रमास सर्व भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने देण्यात आले आहे.