माझ्या विरोधात कणकवली मतदारंघात उबाठाला उमेदवारच मिळत नव्हता. त्यामुळे टिळा लावून आता पारकरांना उभं केलंय – आमदार नितेश राणे 

9

 

कणकवली दि २८ (प्रतिनिधी

माझ्या विरोधात कणकवली मतदारंघात उबाठाला उमेदवारच मिळत नव्हता. त्यामुळे टिळा लावून आता पारकरांना उभं केलंय – आमदार नितेश राणे 

 माझ्या विरोधात कणकवली मतदारंघात उबाठाला उमेदवारच मिळत नव्हता. त्यामुळे टिळा लावून आता पारकरांना उभं केलंय. एकेकाळी ते आमचेच सहकारी होते. राणे समर्थक होते. त्यांनी आता उर्वरीत वीस-बावीस दिवस जे काही करता येणं शक्य आहे ते करून आपली दिवाळी गोड करावी. त्यासाठी मी देखील त्यांना सर्वतोपरी सहकार्य करेन असा टोला आमदार नितेश राणे यांनी लगावला.

 

कणकवलीतील सभेत बोलताना ते म्हणाले की, कुणावर टीका करण्यासाठी, कुणाचे हिशेब चुकते करण्यासाठी ही निवडणूक मी लढत नाही. तर मला कणकवली विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगिण विकास करायचा आहे. गेली दहा वर्षे मी आमदार होतो. यातील आठ वर्षे विरोधी पक्षात होतो. पण त्या आठ वर्षाचा बॅकलॉगम मी दोन वर्षात भरून काढला आहे.